मोठी बातमी! शरद पवारांवर शस्त्रक्रिया होणार

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) उद्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात पुन्हा दाखल होणार आहेत.

याआधी शरद पवार यांच्या एक डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे आता ब्रीच काँडी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया होणार आहे. आधीची शस्त्रक्रिया सुद्धा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झाली होती.

शरद पवार यांच्या डोळ्याचे ऑपरेशन उद्या मंगळवारी होणार आहे. आज शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तब्येत बरी नसताना सुद्धा शरद पवार शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर होते. 

महत्त्वाच्या बातम्या-