Sharad Pawar | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधी गटाने सत्ताधारी महायुतीला धारेवर धरले आहे. या प्रकरणी लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आज बीड दौऱ्यावर असणार आहेत.
आज (21 डिसेंबर) शरद पवार मस्साजोग गावी भेट देणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ते भेट घेणार आहेत. यानंतर शरद पवार आपली भूमिका मांडतील. आज ते काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पवार आज मस्साजोग गावी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावात “आमच्या राजाला न्याय पाहिजे” अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत.
शरद पवार आज मस्साजोग दौऱ्यावर
शरद पवार (Sharad Pawar) सध्या पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत. ते थोड्याच वेळात बीडसाठी रवाना होतील. येथून ते मस्साजोग गावी जातील. यानंतर पवार माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना सक्तीच्या वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा केली होती. यानंतर अविनाश बारगळ यांना रजेवर पाठवण्यात आलंय. त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे पदभार देण्यात आलाय. काल फडणवीस यांनी वाल्मिक कराडचे नाव घेत मोठी ग्वाही दिली.
वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा(Mocca) लावण्यात येणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले, यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सरपंच हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी गावकऱ्यांकडून मोठं आंदोलन उभारण्यात आलं. हा मुद्दा आता राजकारणात देखील पेटला आहे. विरोधी गटाकडून या प्रकरणी महायुती सरकारवर हल्लाबोल केला जातोय. अशात आज शरद पवार (Sharad Pawar) बीड दौऱ्यावर येणार आहेत.
News Title – Sharad Pawar will visit Santosh Deshmukh family today
महत्त्वाच्या बातम्या-
“माझ्या बाबांना ज्या प्रकारे मारलं, तशीच शिक्षा…”; संतोष देशमुखांच्या मुलीचा टाहो
इंधनदरात दिलासा! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर
मेष ते मीन आज शनिदेव कोणत्या राशींवर ठेवणार कृपादृष्टी?, वाचा राशीभविष्य
सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया!
‘नोकरी टिकवायची असेल तर मला…’; ऑफिसमधल्या महिलेसोबत नक्की काय घडलं?