“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी आतापर्यंत पाचवेळा माफी मागितली असती”
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला आहे. बृजभूषण सिंह हे राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यातच बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. 2008 पासून मी राज ठाकरेंचा विरोध करत आहे, अशी आठवण बृजभूषण सिंह यांनी सांगितली आहे. मी मराठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात नाही. मी केवळ एका व्यक्तीच्या विरोधात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्या व्यक्तीने उत्तर प्रदेशची माफी मागावी अन्यथा संतांची माफी मागावी, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. आता त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. शरद पवार मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांनी आतापर्यंत पाचवेळा माफी मागितली असती, असंही बृजभूषण सिंह यांनी म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंचा विरोध केल्यानंतर भाजप नेत्यांना वाईट वाटायचं काही कारण नाही. भाजपला युपीचे मते नको आहेत का?, असा सवाल बृजभूषण सिंह यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे, कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही”
गुड न्यूज! यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘…म्हणून माझं लग्न होत नाहीये’; कंगनानं स्पष्टच सांगितलं
…म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम
भाजपला मोठा झटका?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता
Comments are closed.