Top News राजकारण

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून धक्का बसला; शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं उघडण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलीये. याच मुद्द्यावरून शरद पवारांनी थेट पंतप्रधना नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

शरद पवार पत्रात लिहितात, “राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांचं मत व्यक्त केलं याचा आनंद आहे. मात्र हे पत्र मीडियामध्ये प्रसिद्ध झाल्याने शिवाय या पत्रात जी भाषा वापरली गेली आहे ती पाहून धक्का बसला आहे.”

ते पुढे लिहितात, “पत्रात वापरण्यात आलेल्या अयोग्य भाषेची तुम्हीही दखल घेतली असेल ही खात्री आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र हे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिल्याप्रमाणे वाटतंय. राज्यपालांच्या वागण्याने दुःख झालंय आणि हा खेद तुमच्याकडे व्यक्त करतोय.”

महत्वाच्या बातम्या-

अनिल परब यांना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांकडून आमदारांची बैठक रद्द

…अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज- चंद्रकांत पाटील

धोनीच्या मुलीला देण्यात आलेल्या बलात्काराच्या धमकीवर शाहिद आफ्रिदी म्हणाला…

…तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन; कन्हैया कुमार यांचा व्हिडीओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या