बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, आता संभाजी ब्रिगेड ‘ही’ भेट पाठवणार!

पुणे | महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीयवाद वाढल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखनात दंतकथा नसल्याचा दावा राज यांनी केला होता. त्यामुळे राज ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये वाद उफळून आला.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाला आहे. राज्यात जाती फक्त अभिमान बाळगण्यासाठीच होत्या. परंतू गेल्या 20 वर्षांपासुन जातीबद्दलचं चित्र बदललं आहे. माणसे जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा आता जातीचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सगळं राजकीय स्वार्थामधून घडत असून तीच नेत्यांची ओळख झाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. याचाच धागा पकडत प्रवीणी गायकवाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राज ठाकरेंना बाबासाहेबांच्या इतिहासाशिवाय इतर गोष्टींच्या बाबतीत आकलन नाही. तसेच त्यांनी प्रबाेधनकरांचे साहित्य वाचावं आणि तसा वैचारिक वारसाही जपावा. राज्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघर्ष आठवावा. राजकारणात स्वत:च्या फायद्यासाठी महाराष्ट्रात हा माणूस संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. त्यासोबतच  संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं कुरिअर करणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या जातीयवाद या टिकेवर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले होते की, राजबद्दल न बोललेलंच बरं.  त्यांनी प्रबोधनकारांचं लिखाण वाचावं असा सल्ला शरद पवारांनी राज ठाकरे यांना दिला होता.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर तालिबान्यांनी दिला ‘हा’ पहिला आदेश!

चार दिवसांपासून खासदार उदयनराजे रुग्णालयात, पुण्यात उपचार सुरु!

कार प्रेमींसाठी जबरदस्त बातमी, ‘ही’ जबरदस्त गाडी लवकरच लाँच होणार!

“तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला, महाराष्ट्राला जास्त सतर्क रहायला हवं”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More