बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्यांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी तर फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतूक, म्हणाले…

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सातत्यानं वाद होत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फडणवीसांनी अनेकदा शाब्दिक हल्ले चढवले आहेत. अशातच आता चहूबाजूंनी राज्यात भाजप टीका करत असताना फडणवीसांनी शरद पवारांचं कौतूक केलं आहे.

माध्यम समुहाच्या कार्यक्रमात फडणवीसांच्या हस्ते शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे आणि पवार यांचं कौतूक केलं आहे. राजकारणातील आणि उद्योगातील प्रसिद्ध व्यक्तींचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात  येतोय याचा मला अभिमान वाटतोय, असं फडणवीस म्हणाले आहेत.

राजकारणात अशी समृद्ध प्रक्रिया फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळते. पवार साहेब आणि शिंदे साहेब यांचं काम आणि कौतूक महान असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप नेते करत असताना फडणवीसांच्या वक्तव्यानं राजकारणात रंगत आणली आहे.

दरम्यान, काही काळापूर्वी फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान शरद पवारांवर जहरी टीका केली होती. त्यावरून राजकारणात मोठी जुगलबंदी देखील रंगली होती. त्यानंतर आता फडणवीसांनी पवारांचं कौतूक करत राज्याच्या राजकीय संस्कृतीचा नमुना दाखवला आहे.

थोडक्यात बातम्या – 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी?, देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…

रोंगाली बिहू कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा जलवा, पारंपारिक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल

युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची शेवटची खेळी?, धक्कादायक माहिती समोर

किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More