औरंगाबाद महाराष्ट्र

शेतकरीपुत्राच्या शरद पवारांना हटके शुभेच्छा; साडेचार एकरात साकारली प्रतिमा!

औरंगाबाद | उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी येथे शेतकरी पुत्राने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 600 किलो बियाणांचा वापर करत ग्रास पेंटिंग केली आहे. पेरलेल्या बियांपासून अंकुर फुटून आलेल्या पिकात पवारांचे रेखीव चित्र साकारलं आहे.

शरद पवारांचे शेती क्षेत्राच्या विकासासाठी मोठं योगदान आहे. पवारांनी स्वतः बांधावर येऊन चित्राची पाहणी करावी, अशी मागणी चित्रकार शेतकरी पुत्र मंगेश निपाणीकर यानं केली आहे.

निपाणी येथील शेतकरी पुत्र मंगेश निपाणीकर या शेतकरी पुत्रानं शरद पवारांची प्रतिमा साकारत त्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश आणि बाळासाहेब पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात भव्य दिव्य अशी ही प्रतिमा एक लाख 80 हजार स्क्वेअर फूट जागेत साकारली आहे. या कलाकृतीचं छायाचित्रण अजय नेप्ते या तरुण चित्रकारानं केलं आहे.

शरद पवारांची ही कलाकृती साडे चार एकर जमिनीवर साकारली असून त्यासाठी 600 किलो बियाणांचा वापर करण्यात आला आहे. यात 200 किलो अळीव, 300 किलो मेथी , 40 किलो गहू, 20 किलो ज्वारी आणि हरभरा 40 किलो, असं धान्य पेरणीसाठी वापरलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या