बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

नवी दिल्ली | सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे संकेत दिले आहेत. पवारांनी ‘अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह’ मंच निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातच काँग्रेस एकटी पडणार की काय? असा सवाल केला जात आहे.

शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं म्हटलं आहे. तिसऱ्या आघाडीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनीही तिसरी आघाडी बनविण्यावर जोर दिला आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही तिसरी आघाडी निर्माण करण्यावर जोर दिला आहे.

पश्चिम बंगाल सारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्वाकडून हल्लाबोल सुरू आहे. त्यामुळे अशावेळी लोकशाहीवादी पक्षांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला पाहिजे. येचुरी यांचा फोन आला होता. ‘अल्टरनेटीव्ह’ मंच निर्माण करण्याची गरज आहे. त्याबाबत विचार करा. आपण किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यात काहीच अंतर्विरोध नाही, असं येचुरी यांनी म्हटल्याचं पवारांनी सांगितलं होतं. अनेक नेत्यांनी पर्यायी आघाडी निर्माण करण्याचा आग्रह धरला आहे. त्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे, असं देखील शरद पवारांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्यास अनेक प्रादेशिक पक्ष तयार नाहीत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, त्यावर या आघाडीचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे.

थोडक्यात बातम्या – 

करुणा शर्मा आता राजकारणाच्या आखाड्यात, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा- चंद्रकांत पाटील

मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत?; आतापर्यंत केलीय ‘ही’ जबरदस्त कामगिरी

‘पुरावा असेल तर…’; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनेलच्या 2 संचालकांना अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More