Nashik | राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election) होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 जागांवर महाविकास आघाडी (MVA) यांच्यात जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. जवळपास 17 जागांवर एकमत होऊ शकलं नसल्याची चर्चा आहे. याआधी अनेक इच्छुक उमेदवारांकडून तिकिटासाठी फिल्डिंग लावली जात आहे.
शरद पवारांचा मोठा डाव
शरद पवार गटात तर इच्छुकांची रांग लागल्याचं दिसतंय. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केलाय. अशात आणखी एक नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ते आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार असून उदय सांगळे हे सिन्नरमधून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election | सांगळे विरुद्ध कोकाटे लढत?
विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून निवडणुकीच्या तोंडावरच उदय सांगळे शरद पवार गटात दाखल होणार आहेत. असं झाल्यास उदय सांगळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळाले तर सिन्नरमध्ये उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
उदय सांगळे यांचा सिन्नरमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. ते विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे शरद पवारांकडून उदय सांगळे यांनी तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर सत्य उघड! अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, ऐश्वर्याला देणार घटस्फोट?
तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर
अजितदादा गटाची यादी थोड्याच वेळात जाहीर; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
लाडकी बहीण योजना बंद? आदिती तटकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण
लोकसभेतील जरांगे फॅक्टरमुळे भाजप सावध, विधानसभेला मोठी खेळी