बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रडीचा डाव सुरु आहे”; ‘त्या’ निकालाबाबत शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल असं चित्र आहे. पण यात ममता बॅनर्जींच्या निकालाची चर्चा सगळीकडे आहे.

एकदा ममता बॅनर्जी जिंकल्याची बातमी आली. वीस मिनिटांत ममता नंदीग्राममधून हरल्या, असं सांगण्यात आलं. मग ममतांनी नंदीग्राममधला जनतेचा कौल मान्य केल्याचं म्हणजे हार मान्य केल्याचं वक्तव्य आलं. त्यानंतर तृणमूलने, अजून मतमोजणी संपलेली नाही, अफवा पसरवू नका, असं ट्विट केलं आहे. त्यामुुळे ममता बॅनर्जी विजयी झाल्या की पराभूत झाल्या? हे अद्यापही स्पष्ट नाही. यावर रडीच डाव असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

रडीचा डाव! बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, नंदीग्रामचा निकाल काहीही लागो, जनतेचा कौल आपल्याला समजला आहे, अशा ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याने त्यांनी नंदीग्रामची हार मान्य केल्याचं समजलं गेलं. त्यामुळे काही वेळापूर्वी ममता जिंकल्या अशा बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी पुन्हा ममता हरल्या हे सांगायला सुरुवात केली. मात्र अधिकृतपणे निवडणूक आयोगाने तसं जाहीर केलेलं नाही.

 

थोडक्यात बातम्या-

नंदिग्राममध्ये ममतांचा खरंच पराभव झाला का?, तृणमूलचं महत्त्वाचं ट्विट

आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसच्या विजयाचं संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावं- उद्धव ठाकरे

“राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More