बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जाते- शरद पवार

मंबई | गेल्या काही दिवसात राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलच तापलेलं दिसत आहे. शनिवारी मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी शरद पवार यांनी केलेल्या भाषणामध्ये सध्याच्या राजकारणाबाबत भाष्य केलं आहे. या कार्यक्रमात बाबा आढावदेखील उपस्थित होते.

शरद पवार यांनी या कार्यक्रमात मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. जेव्हा सदनात मृणालताई गोरे असायच्या तेव्हा अनेकदा वाद व्हायचे, परंतु ते राज्याच्या हिताचे असायचे. त्याकाळी सुसंवाद पाहायला मिळायचा, तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जात आहे, असं शरद पवार म्हणाले.

गोरेगावातील केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्या इमारतीत समाजवादी चळवळीतील मृणालताई गोरे नावाच्या इंझावाताचा कलाविष्कार त्यांच्या संघर्षमय प्रवासाची ओळख दाखवणारा आहे. त्याचबरोबर तो संघर्ष नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल. वैद्यकिय शिक्षण सोडून देऊन सामाजिक रोगावर उपचार करण्यासाठी चूलघरातील लाटणे, हंडे आणि थाळ्यांसारखी हत्यारं हाती घेऊन संघर्ष उभा करणाऱ्या मृणालताईंना कलादालनाच्या रूपाने दिलेली ही खरी श्रद्धांजली आहे, असं देखील शरद पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते. मृणालताईंचे एक दालन आज सुरू होत आहे ही खरोखरच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. अशा दालनामुळे मृणालताई कोण होत्या? ते या दालनामुळे सगळ्यांना कळेल, असं सुभाष देसाई म्हणाले. शरद पवारांनी कोथळ काढण्याबाबत वक्तव्य करत उपरोधिक टोला लगावला.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं वक्तव्य

‘आजकालचे क्रिकेटपटू कोणताही मोठा निर्णय….’; विराटच्या कर्णधारपद सोडण्यावरून कपिल देव संतापले!

‘आपण भूतकाळ बदलू शकत नसलो तरी…’; शिल्पाने राज कुंद्रासोबतच्या नात्याबाबत दिले संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

भाजपला मोठा धक्का, राजकीय संन्यास घेतो म्हणणारे बाबूल सुप्रियो तृणमूलमध्ये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More