Top News

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले…

मुंबई |  सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. परंतू आरक्षणा अगोदर मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा असून त्यासाठी त्यांनी बैठक बोलवली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठा आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती धक्कादायक असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणला स्थगिती मिळाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर बैठक झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

चीनने भारताची जमीन घेतली याला सुद्धा देवाची करणी म्हणायचं का?- राहुल गांधी

क्वीन कंगणा एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते 1.5 कोटी तर पुर्ण चित्रपटासाठी…..

“कंगणाचं ऑफिस अनधिकृत? असेलही… पण ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे?”

‘त्या पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते’; ‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या