एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर यातून काहीतरी मार्ग निघेल असं, शरद पवार म्हणालेत.
2019 साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झालं तेव्हादेखील आमच्या पक्षाच्या काही आमदारांना उचलून हरियाणात आणण्यात आलं होतं. पण नंतर ते तिथून निघून आले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि गेली अडीच वर्षे ते कार्यरत आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीमधूनही काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
मला सीएम बनवा, हे एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं माझ्या ऐकिवात नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद, तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यावी, असं पवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचं नेतृत्व जे ठरवेल, त्यासोबत आम्ही असू, पण मला पूर्ण विश्वास आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगलं सरकार चाललंय, त्यात कुठल्याही बदलाची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ऑफर
“…त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार नाही”
“एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही”
मतदान सुरू असताना एकनाथ शिंदेंनी प्लॅनिंग केलं?; महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.