मुंबई | छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा एक प्रतिनिधी निवडून येण्यास अडचण नाही. संभाजीराजेंना उरलेली मत देण्यात येतील, असं पवार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ.
दरम्यान,संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता असून महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात. शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात
“ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभाय”
“जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या…”; दिपाली सय्यदांची फडणवीसांवर टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन
“महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती?, आम्ही त्यांना सोडणार नाही”
Comments are closed.