बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPA अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कोल्हापूर | राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे संयुक्त आघाडीचं (UPA) अध्यक्षपद सोपवण्यात यावं याबाबतचा ठराव मांडण्यात आला व तो संमत देखील करण्यात आला.

यामुळे शरद पवार युपीएचे अध्यक्ष होणार का?, याबाबतच्या चर्चांना राजकीय वर्तुळात पुन्हा उधाण आलं. शरद पवार युपीए अध्यक्ष होण्याच्या चर्चा रंगत असताना शरद पवार यांनी कोल्हापूरात बोलताना युपीए अध्यक्षपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरूणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, मी युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार नाही. मात्र, एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठींबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे, असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यांना हेडलाईन मिळत नाही”

“भाजपला आता आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला”

“राज ठाकरे यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही”

“पवार साहेब, उतार वयात विस्मरणाचा रोग जडला की कोलांट्या मारण्याची सवय?”

Raj Thackeray: “जो माणूस इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More