‘…तर मी सरकारसोबत असेन’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बारामती | बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उपस्थित आहेत. यावेळी बोलताना शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलंय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चां रंगली आहे.

शरद पवारांचं मोठं वक्तव्य

तुम्ही जर तरुणांच्या हाताला काम दिलं, तर आम्ही तुमच्यासोबत राहू. ही खात्री मी तुम्हाला देतो, असं शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी पवारांनी सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं.

रोजगारासाठी सरकार पावलं टाकतंय ही चांगली गोष्ट आहे. राजकारण एका बाजूला असतं. मुलांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू. एवढी खात्री मी तुम्हाला देतो, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

शरद पवार यांनी यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या विविध संस्थांची माहिती दिली. तसेच विद्या प्रतिष्ठानमधून कोणतं शिक्षण दिलं जातं? किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो? कोणत्या कोणत्या कंपन्या या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतात याची माहितीही शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.

पवार कुटुंब एकाच मंचावर

बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. विचारपूस केली. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला.

मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजितदादा होते. त्यांंच्या पाठीमागून सुप्रिया सुळे गेल्या. समोर देवेंद्र फडणवीस येताच त्यांनाही सुप्रिया सुळे यांनी नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली. समोरा समोर येऊन देखील अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टाळल्याचं दिसलं. तसेच सुप्रिया सुळेंनी अजित पवारांकडे पाहिलं देखील नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

गौतम गंभीरने घेतला सर्वांत मोठा निर्णय!

गुड न्यूज! वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप

‘मी 18 वर्षांची असताना…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा करण जोहरबद्दल मोठा खुलासा

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर!