शरद पवारांकडून गृहमंत्र्यांना क्लीनचीट, मात्र काँग्रेस म्हणते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा!
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लावल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला. विरोधकांनी या प्रकरणात सरकारला चांगलंच धारेवर धरलं. या सर्व प्रकरणात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व प्रकरणात आता काँग्रेसनेही आपली बाजू स्पष्ट केली आहे.
काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे मंत्री एच.के पाटील यांनी एक पत्र जारी करून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा पूर्णतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असून मी स्वतः यासंबंधी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली आहे. त्याबरोबरच, आम्ही संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनाही यासंदर्भात बोलणार असून अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, अनिल देशमुख यांचा राजीनामा हा एक पर्याय या प्रकरणात असल्याचंही त्यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलं.
शरद पवार यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतील राजीनाम्याच्या मुद्द्यावर पाटील यांनी उजेड टाकत राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनीही या पर्यायाचा विचार करून चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं. पण अंतिम निर्णय हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाच आहे. असं त्यांच्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं एकंदर चित्र या सगळ्यांमधून दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीबद्दलची माहिती चुकीची असल्याचं सांगितलं आहे. परमबीर सिंह यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात होते आणि त्यानंतर ते विलगीकरणत गेले. यासंबंधीची माहिती रुग्णालयातून मी घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, परमबीर सिंह यांचे आरोप तथ्यहीन असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. तसेच राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत त्यांनी एकप्रकारे अनिल देशमुखांना क्लिनचीट दिली.
या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असल्याचं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं असल्याने आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या –
मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल- शरद पवार
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18 वर्षीय मुलीनं बाप झोपेत असतानाच त्याचा गळा आवळला; ‘हे’ ठरलं कारण!
पुण्याची मान शरमेनं खाली!; महिलांवरील ‘या’ अत्याचारात पुणे सर्वात पुढे!
मुलगी लग्नास तयार होत नव्हती म्हणून… बापाच्या कृतीनं महाराष्ट्र हादरला!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.