बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार सहकुटुंब गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी!

मुंबई | गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असून सध्या सगळीकडे जल्लोषाचं वातावरण झालं आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायांच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले आहेत.

गणेशोत्सवाचं औचित्य साधत शरद पवार यांनी सहकुटुंब शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं दोन्ही कुटुंबं एकत्र आले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गणरायाच्या आगमनानं आता कोरोना महामारीचं संकट टळावं हीच प्रार्थना जगभरातून केली जात आहे.

दरम्यान, आपण करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. नाहीतर गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि जल्लोष असं चित्र असायचं. आता कोरोनाचा धोका लक्षात घेत सगळं सण-उत्सव साधेपणानं साजरे केले जात आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री; ‘इतक्या’ जागा लढवणार

“कोणत्याच भूमिकेवर ठाम नसणं हा राष्ट्रवादीचा इतिहास”

गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार?, ‘या’ पाच नावांची जोरदार चर्चा

गीता समोताची ऐतिहासीक कामगिरी; आफ्रिकेतील 16000 फूट उंच किलीमंजारो शिखर केला सर

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More