…आणि शरद पवारांची पहिली कविताच शेवटची ठरली!

पुणे |आपली पहिलीच कविता शेवटची कशी ठरली, याचा किस्सा शरद पवार यांनी पुण्यात ऐकवला. शरद पवारांचे स्वीय सहाय्यक आणि उप जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या ‘पाझर हृदयाचा” या कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

कॉलेजमध्ये असताना “का रोहिणीस वाटे चंद्रासवे रहावे, हे आपुले स्वप्न तू XYZ पूर्ण करावे” असं कागदावर लिहिलं होतं आणि ते नेमकं माझ्या आईच्या हातात पडलं. त्यावेळी माझे मोठे बंधू म्हणाले, “शरदसाठी आता मुलगी बघा आणि त्याचं लग्न लवकर पूर्ण करुन टाका. नाहीतर त्याचं अपुरं स्वप्न कुठं जाईल याचा काही भरवसा दिसत नाही”, असं शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. 

पाहा व्हिडिओ-