केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हिंगोली | अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. केतकी चितळेच्या पोस्टनंतर अनेक तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. शरद पवारांनी केतकी चितळेवर भाष्य करणं टाळलं आहे.
हे प्रकरण काय आहे. हे मला ठाऊक नाही. व्यक्तीही माहित नाही. तुम्हा सांगता तेही माहिती नाही. त्यांनी काय केलेलं आहे?, एक्झॅटली काय घडलं हे कळल्याशिवाय बोलता येणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. दोन तीन दिवस माझ्याबद्दलची एक तक्रार वाचली होती, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
केतकी चितळेच्या पोस्टवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षातील नेते असतील किंवा अन्य कोणी असेल, अशा पद्धतीने वक्तव्य करू नयेत, असं म्हणत अजित पवारांनी निषेध व्यक्त केला आहे. अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांना मनोरूग्णचं म्हणावं लागेल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, केतकी चितळेला अटक केल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. केतकीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“उद्धवजींचं नाव घेतल्याशिवाय या बबली बंटीला प्रसिद्धी मिळत नाही”
केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे संतापले, म्हणाले…
रूपाली ठोंबरे आक्रमक, केतकी चितळेला दिला गंभीर इशारा
‘लाजा वाटल्या पाहिजेत’; केतकीच्या पोस्टवर छगन भुजबळ भडकले
“भगवे वस्त्र चढवून हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे काही…”
Comments are closed.