बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिल्वर ओकवरील घटनेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | राज्यासह देशात खळबळ उडवून देणारी घटना आज राज्यात घडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल आणि दगडांनी हल्ला केला. परिणामी राज्य पोलीस दलावर सर्वस्तरातून टीका होत आहे. अशात पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आपण त्यांच्या पाठीशी आहोत पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण नाहीत. चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल तर त्याला रस्ता दाखवणं हे तुमचं आमचं काम आहे, असं पवार म्हणाले आहेत. थोडी माहिती तुम्हाला मिळाल्यावर बाकी जण पण इथं आले, असं पवार म्हणाले आहेत.

नेता शहाणा नसला की कार्यकर्त्यांवर परिणाम होतोय हे आज दिसल्याचं पवार म्हणाले आहेत. शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना कुणा एका नेत्याचं किंवा संपकरी नेतृत्वावर देखील टीका केली नाही. राज्यात ही घटना घडताच सर्वस्तरातून पवारांच्या तब्येतीबाबत विचारणा होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मतभेद असतात, संघर्ष असतात त्यावर टोकाची भूमिका न घेणं हीच राज्याची राजकीय संस्कृती आहे, असं पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवारांनी 120 एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं”

“नरेंद्र मोदींनी ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘गुजरात फाईल्स’ची प्रसिद्धी करावी”

ST कर्मचाऱ्यांचा पवार कुटुंबीयांना घेराव; सुप्रिया सुळेंची आंदोलकांना हात जोडून विनंती, म्हणाल्या…

ईडीच्या कारवाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राहुल गांधींचा मोठा दावा म्हणाले, “श्रीलंकेसारखं भारतातील सत्य देखील…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More