बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचा सदानंद गौडा यांना पत्राद्वारे शाब्दिक टोला; म्हणाले…

पुणे | कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील प्रत्येक नागरिक या संकटाला सामोरं जात आहे. या काळात कोरोनाच्या विरोधात शेतकरी वर्गही लढा देताना दिसत आहे. त्यातच रासायनिक खतांच्या दरात झालेली वाढ धक्कादायक आहे. सरकारनं ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्राकडे केली आहे.

शरद पवार यांनी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांना सणसणीत पत्र पाठवून खतदरवाढीबाबत कान टोचले आहेत. ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील सगळी जनता सध्या होरपळली जात आहे. भारतीय शेतकरी सगळ्यात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्या व्यथा लवकरात लवकर समजून घेण्याची वेळ आहे. मात्र, त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी केंद्रानंं खतांची भरमसाठ वाढ केली आहे’, असं शरद पवार यांनी पत्रात लिहलं आहे.

लाॅकडाऊनमुळं बाजारपेठा डळमळीत झाल्या आहेत. मान्सून तोंडावर असताना खत दरवाढीचा निर्णय दुर्देवी आहे. त्यामुळं देशातील पेरणीपुर्वी शेती कामं बाधित होतीलच, मात्र भविष्यातील उत्पादन खर्च आणि पिकांच्या उत्पादकतेवरही परिणाम होईल. खतदरवाढीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे’, अशा शब्दांत पवार यांनी टोला लगावला आहे. तर, आमदार सतीश चव्हाण यांनी लिहलेल्या या संदर्भातील पत्र सुद्धा पवार यांनी गौडा यांना पाठवलं आहे.

दरम्यान, खतांच्या वाढलेल्या किंमतीबाबत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्र देऊन लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत पवार यांनी केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकरी हितासाठी यात लक्ष घालण्याची सुचना केली आहे.

थोडक्यात बातम्या

मिर्झापूरमधील स्विटी म्हणजेच श्रीया पिळगावकरचा हा चोळी अन् नथीचा लुक पाहिलात का?

तौक्ते चक्रीवादळामुळे तब्बल 93 जण झाले बेपत्ता; युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू

नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले…

तुमचं SBI बँकेमध्ये काम आहे?, तर ही बातमी नक्की वाचा; बँकेने लागू केले नवीन नियम

लाॅकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुली लागल्या वेश्याव्यवसायाला, धक्कादायक प्रकार आला समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More