बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना मदत करा’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे.

कोविड-19 ह्या जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे, असं शरद पवार म्हणाले.

लॉकडाऊनमुळं  राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी शरद पवारांनी केलीये. आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल. हा विश्वास मला आहे, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार नुकतेच घरी आले आहेत. शस्त्रक्रियेनंतर आज पुन्हा एकदा ते राजकारण आणि आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

सिस्टम नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व फेल झालं- सोनिया गांधी

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आणखी तीन दिवसांचा लॉकडाउन वाढवला

शरद पवार-सुप्रिया सुळे यांचा मुंबईत फेरफटका, पाहा शरद पवारांचा लाईव्ह व्हिडीओ

राष्ट्रवादीनं पुण्याचा शहराध्यक्ष बदलला, ‘या’ नेत्याला दिली संधी

डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More