बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव!

मुंबई | मागील काही वर्षांपासून वनस्पतीशास्त्राला सुगीचे दिवस आले आहेत. या क्षेत्रात नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. या संशोधनात आता तरूणाईचा सहभाग देखील वाढलेला दिसतोय. अशाच कोल्हापूरच्या दोन युवा प्राध्यापक संशोधकांनी एका नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. एवढंच नाही तर, त्या वनस्पतीला भारताचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचं नाव देण्यात आलं आहे.

कोल्हापूरातील डाॅ.विनोद शिंपले आणि डाॅ.प्रमोद लावंड या दोन संशोधकांनी सह्याद्री पर्वत रांगेत एका नव्या वनस्पतीचा शोध लावला. या नव्या वनस्पतीचं ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ असं नामकरण करण्यात आलं आहे. पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल हे नाव दिलं असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे. गारवेल कुळातील ही वनस्पती असून, डाॅ. विनोद शिंपले गेल्या वीस वर्षांपासून या कुळातील वनस्पतींवर संशोधन करत आहेत. त्यांनी गारवेल कुळातील आतापर्यंत 5 नव्या वनस्पतींचा शोध लावला आहे.

अर्जेरिया शरदचंद्रजी या नव्या वनस्पतीचे संशोधन कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या ‘रिडीया’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून नुकतंच प्रकाशित केलं आहे. अर्जेरिया शरदचंद्रजी या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुले येतात, तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान फळे येतात. या वनस्पतीला पिवळ्या रंगाची फुले येतात. तर ही वनस्पती मुख्यत्वे आशिया खंडातच सापडते.

दरम्यान, डाॅ.विनोद शिंपले आणि डाॅ.प्रमोद लावंड या दोन्ही संशोधकांचं मी माझ्या कुटूंबाच्या वतीने आभार मानते. महाराष्ट्र हे आपलं कुटूंब आहे हे साहेब नेहमी सांगतात. त्यामुळे असा आदर आणि सन्मान कुटूंंबातच होऊ शकतो. या दोन संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन हे साहेबांच्या नावे समर्पित केलं याचा मला नितांत आदर आहे, असं मत शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुन्हा नशिबी फरपट? लॉकडाऊनची भीती, परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ!

धक्कादायक! भररस्त्यात तरूण उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

धक्कादायक! पतीसमोरच तिघांनी केला महिलेवर सामुहिक बलात्कार

‘…हे पाहिल्यानंतर मी कधीही मास्क विसरणार नाही’; मुंबई पोलिसांनी दिलेल्या शिक्षेला आनंद महिंद्राही घाबरले

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More