Sharad Pawar: UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत, रोहित पवार म्हणाले…
मुंबई | उत्तर प्रदेश विधानसभा आणि देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देशातील विरोधकांनी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचं अध्यक्षपद शरद पवारांनी घ्यावं, यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसने प्रस्ताव संमत केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) युपीएचे अध्यक्ष होणार का?, अशी चर्चा देशात सुरू आहे. त्यातच आता युपीए अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार अनेक तरूणांना आपलेसे वाटतात. युपीएच अध्यक्षपद त्यांनी भूषवावं असं अनेकांना वाटतं. परंतु, युपीएतील घटक पक्षातील वरिष्ठ नेते यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना रोहित पवारांनी काँग्रेसच्या नाराज आमदारांवर देखील भाष्य केलं आहे.
कोणत्याही पक्षाच्या आमदारांना सर्वोच्च नेत्याला भेटण्याचा अधिकार असतो, असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या काही युवा आमदारांना विधानसभेत त्यांचे विषय मांडता आले नाहीत. विरोधी पक्ष सातत्याने गोंधळ घालत होते त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकुब करावं लागलं. त्यामुळे या आमदारांना वेळ देता आला नाही. त्यामुळे हे आमदार नाराज आहेत, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणामध्ये शरद पवारांनी युवकांना संबोधित केलं. ज्या तरुणांना संघटनेची विचारधारा आणि उद्देश पूर्णपणे माहित आहे, तो तरुण एक दिवस राजकारणात नक्कीच यशस्वी होईल. आमची विचारधारा गांधी, नेहरू, टिळक, सुभाषचंद्र बोस आणि मौलाना आझाद यांच्या विचाराने प्रेरित आहे. या सर्व लोकांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी मोठा संघर्ष केला, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
Narendra Modi: पंतप्रधान मोदी सर्वांत शक्तिशाली भारतीय; वाचा दुसऱ्या क्रमांकावर कोण?
मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता मास्क सक्तीही नाही
“तुमचे निर्बंध घाला चुलीत, हिंदू सणांवर बंधनं लादू नका”
नवाब मलिकांचं टेन्शन वाढलं! आता ईडीचं पथक नाशकात धडकलं, चौकशी सुरू
महागाईवर प्रश्न विचारताच बाबा रामदेव भडकले, व्हिडीओ व्हायरल
Comments are closed.