राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मुंबई | समर्थांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल?, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. राज्यपालांनी शिवरायांचा उल्लेख करत केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी शरद पवारांचा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे. महाराजांचं कर्तृत्व रामदासांमुळे आहे हे खरं नाही, असं शरद पवार या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत.
शिवाजी महाराजांचे खरे गुरू राजमाता जिजाऊ माता होत्या. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. त्याकाळी ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं, असं शरद पवार या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत केलेल्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यात शरद पवार यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत असल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@maha_governor Koshiyari ji… please note correct lesson in history.
@supriya_sule @MumbaiNCP @NCPspeaks pic.twitter.com/8PrUUZqhSw— Sanjay Tatkare | संजय तटकरे (@tatkare_sanjay) February 28, 2022
थोडक्यात बातम्या-
थायरॉईड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ ज्यूस ठरतील फायदेशीर
“माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी हे उपोषण थांबणं गरजेचं”
“घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो”
“… त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री महोदय अजून किती सहन करायचं”
MSEB विरोधात शेतकरी आक्रमक, अज्ञातानं सबस्टेशन पेटवलं
Comments are closed.