बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवार-मोदी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले…

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने राज्यभरात चर्चेला उधाण आलं होतं. राज्यातील अनेक नेत्यांनी शरद पवार आणि पंतप्रधानांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातच आता शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भेटीसंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 12 आमदारांबाबत निर्णय घेतला नाहीत. तसेच लक्षव्दीपबाबत प्रशासक म्हणून प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय चुकीचे असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंवर देखील शरद पवारांनी टीका केली आहे.

नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी पाठपुरावा करत आहे. 75 हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांचा मुद्दाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिला आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान,  दोन्ही विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच विचार करतील, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे सुरू आहे. भाजपसोबत आमचे कोणतेही संबंध नव्हते आणि आणि पुढेही असणार नाहीत. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपची कटुता ही राष्ट्रवादीशी नाही तर शिवसेनेशी”; भाजपच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात इतक्या रुपयांची घसरण

BREAKING | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट, चर्चांना उधान

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख CBI च्या ताब्यात

राजकीय भुकंप होणार?; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More