बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यातून कर गोळा करता मग त्यांचा वाटा का देत नाही?”

सोलापूर | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या घटनेनंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकरणात सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ईडीच्या कारवाया देखील सुरु आहेत. या सर्व गोष्टींवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सवाल उपस्थित केला आहे.

शरद पवारांनी 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करत असाताना केंद्र सरकारवर सवाल केला आहे. यावेळी दिल्लीवरुन राज्य सरकारला त्रास दिला जातो, राज्यातून कर गोळा केला जातो, मात्र तो राज्याला का दिला जात नाही?, असा घणाघाती सवाल करत शरद पवारांनी केंद्र सरकारला केला आहे.

याबाबत बोलताना केंद्र सरकार अतिवृष्टीचे पैसे देखील देत नसून टाळाटाळ करत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. अतिवृष्टीचे पैसे देताना आज देऊ, उद्या देऊ अशी कारणे दिले जातात, असं पवारांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्दांवरुन स्पष्टपणे घणाघात केला आहे. तसेच त्यांनी वाढत्या महागाईला देखील भाजपला जबाबदार ठरवलं आहे.

दरम्यान, मेळाव्यात भाष्य करत असताना आपण सामाजिक बांधिलकी सोडणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत सांगताना लखीमपूर घटनेचा संबंध जालियनवाला बागेशी जोडला जात आहे. हा उल्लेख सत्ताधाऱ्यांना रुजला नसून एका सत्ताधारी नेत्याने आपल्याला ते सांगितल्यामुळे छापेमारी करण्यात आली. मात्र तुम्ही छापा मारा नाहीतर काही करा, मी सामाजिक बांधिलकी सोडणार नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पाया पडतो पण रिषभपासून दूर राहा’; नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ‘या’ अभिनेत्रीला ट्रोल

“हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथं आमच्या भगिनी कधीही लाचार होणार नाहीत”

“पंतप्रधानांच्या कानापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’चा आवाज पोहोचवणार”

‘तुम्ही त्याच्या भविष्यासोबत….’; रविना टंडनही भडकली, बॉलिवूड तारकांचा आर्यनला पाठिंबा, !

“महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More