Top News महाराष्ट्र मुंबई

मला मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करु?; शरद पवारांचा मिश्कील सवाल

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात आपल्याला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या या इच्छेवर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळं काही संधी आहे का?, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारानं शरद पवारांना विचारला. त्यावर ‘उद्या मला मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही’, असं शरद पवारांनी हसत सांगितलं.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं आहे. त्यासाठी ते शरद पवार कोल्हापुरात आले. त्यावेळी ते बोलतं होते.

दरम्यान, “मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे. माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारं वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करु नये ही विनंती”, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी”

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

“बलात्काराची तक्रार मागे, तरीही ‘या’ कारणामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करा”

बलात्काराच्या तक्रारीसंदर्भात धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा दिलासा

“मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या