कोल्हापूरच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
जालना | राज्यातील वातावरण सध्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चांगलंच गाजत आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पोटनिवडणूक पार पडली असून महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला व भाजपाला पराभवास सामोरं जावं लागलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य लोकांना संधी द्यावी लागते. कोल्हापूर येथेदेखील असंच झालं. कोल्हापूरला विधानसभेची एक जागा रिकामी होती आणि त्याठिकाणी योग्य व्यक्तीला संधी दिली गेल्याने राज्य सरकारच्या विचाराचा आमदार लोकांनी निवडून दिला, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, आता सरकारवर ज्या जनतेने विश्वास दाखवला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते.
दरम्यान, संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस निर्मिती होत असल्याने उसाच्या गाळपाचा प्रश्न भेडसावत आहे. राज्य सरकारर्फत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उसाच्या शेवटच्या टिपराचे गाळप करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
रशियाकडून युक्रेनच्या 8 शहरांवर हल्ला, ‘इतके’ हजार नागरिक बंदी करण्यात आले
उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी, वाचा सविस्तर
अभिनेता सिद्धार्थची पोस्ट चर्चेत; लाडक्या लेकींसोबत फोटो शेअर करत म्हणाला…
स्टाॅयनिसने खेचला 104 मीटर सिक्स, अन् गर्लफ्रेंडला इशारा करत…; पाहा व्हिडीओ
‘असल्या बुरसटलेल्या विचारांमुळेच तुमच्या मुलीला…’; राम सातपुतेंचा खडसेंवर हल्लाबोल
Comments are closed.