बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शरद पवारांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस होता. या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणेंंनी राज्यातल्या शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. रायगड येथील पत्रकार परिषेदमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणेंची जीभ घसरली. त्यानंतर राज्यातल्या राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राणेंवर प्रतिक्रिया आली आहे.

रायगडमधील महाड येथे भाजपची जनआशीर्वाद यात्रा पोहचली होती. उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर नारायण राणेंनी टीका केली होती. “मी, त्या दिवशी नाही का ? किती वर्षे झालीत देशाला स्वातंत्र्य मिळवून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती”, असं नारायण राणें म्हणाले होते.

मला काही त्याबद्दल बोलायचं नाही आहे. मी त्यांना फारस इतकं महत्व देत नाही. राणे त्यांच्या पद्धतीने आणि संस्काराप्रमाणे बोलतात, अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. परंतु ज्या पद्धतीने पोलिसांनाकडून लाठीचा वापर होत आहे, ते पाहता आम्ही राणेंसाहेबांच्या पाठीमागे संपुर्ण पक्ष म्हणून भक्कामपणे उभे आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरे आमचे दैवत, आम्ही त्यांच्यासाठी हजार काठ्या खाऊ”

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

“तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील”

नारायण राणेंना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही- भास्कर जाधव

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More