देश

शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी?

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचं कळतंय.

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

नीता आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा; अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर जे. पी. नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल- नरेंद्र मोदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय!

देशातील ‘या’ नऊ राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या