मुंबई | आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.
मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही. समाजात काही व्यक्तिंना पद असो अथवा नसो मात्र त्यांना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्यामधून राष्ट्रवादीमध्ये पुढील काळात मोठ्या बदलाचे संकेत दिसून येत आहेत.
महत्वाच्या बातम्या-