बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आरोप सिद्ध झालेत आता त्यांनी राजीनामा द्यावा’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आघाडीतील अनेक नेत्यांवर सध्या ईडीची टांगती तलवार आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कोरोना काळातही ठाकरे सरकारकडून कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार सुरूच होता. तसेच मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार रूपये लूटत होते. सामन्या जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ हे जनतेला लूबाडत होते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले असून त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

राज्यातील 27 हजार ग्रामपंचायतींचा टीडीएस परतावा भरण्यासाठी हसन मुश्रीफ यांचा जावाई मतीन यांना कंत्राट दिलं होतं. 1 हजार 500 कोटीचं हे कंत्राट पाच वर्षासाठी दिलं होतं. हे कंत्राट अखेर ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आलं आहे. मतीन यांनी जयोस्तुते कंपनी 8 महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. या कंपनीचा मागील 8 महिन्यापासून काहीच व्यवहार न झाल्यामुळे कंत्राट रद्द करण्यात आला आहे, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांंनी मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील अनिल परब, अजित पवार, अनिल देशमुख, भावना गवळी इत्यादी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या ढवळून निघालं आहे.

थोडक्यात बातम्या- 

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More