बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

सोलापूर | शेतकऱ्यांना ऊसाच्या पिकाची एफआरपीची रक्कम एकर कमी मिळावी या मागणीसाठी सोलापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. या आंदोलनादरम्यान, खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवारांनी केलं आहे. शरद पवारांनी दिल्लीत जाऊन लॉबिंग केलं आहे. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांना देण्याचा अहवाल निती आयोगाकडे दिला आहे. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशी टीका खोत यांनी पवारांवर केली आहे.

शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मगरीचे अश्रू पुसण्याचं काम आहे. एकीकडं शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याचा अधिकार मिळाला पाहिज, असं शरद पवार आपल्या आत्मचरित्रात लिहीतात. मात्र, त्यांनीच कृषी मंत्री असताना शेतीचा पहिला कराराचा प्रयोग 2005 मध्ये आणला.

दरम्यान, या कराराचा बारामती अॅग्रोला सर्वात जास्त फायदा झाला. बारामतीमधील सर्व वैभव त्याच करारामुळं तयार झालं आहे. पोट भरल्यानंतर दुसऱ्यानं जेवण करू नये ते कडू आहे, असं सांगण्यासारखा प्रकार आहे, असा खरमरीत टोला सदाभाऊंनी शरद पवारांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या –

“मुंबईत अंमली पदार्थाची सर्रास तस्करी होत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का?”

‘माझा मुलगा तिथं असल्याचा पुरावा मिळाला तर मी…’; अजय मिश्रा यांचं खुलं आव्हान!

बाबो! ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात करणाऱ्या यामी गौतमला आहे ‘हा’ गंभीर त्वचा रोग!

‘तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर असतो…’; आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया!

मोठी बातमी! 36 तासांच्या नजरकैदेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More