बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”

नवी दिल्ली | आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या भेटीविषयी सांगितलं. सध्या संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केल्याचं पहायला मिळालं.

शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला म्हणून शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असं अजिबात नाही. उलट शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशाच्या राजकारणात नाही, असंही संजय राऊत यांनी माध्यमांसमोर म्हटलं.

पुढे संजय राऊत म्हणाले की, आजही देशातील सर्व प्रमुख, राजकीय पक्षांचे नेते हे शरद पवारांना आदर, मान देतात. ते आम्हा सर्वांसाठी महत्वाचं आहे. राहुल गांधींच्या चर्चेतही हा विषय आला होता.

दरम्यान, राहुल गांधीच्या भेटीविषयी उद्धव ठाकरे यांनी माहिती असून शरद पवार यांनाही काही शंका नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. कारण आम्ही एकाच सरकारमध्ये सरकार सुरळीत सुरु आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात’; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं”

महिलेला मधलं बोट दाखवणं भोवलं; न्यायालयाने तरूणाला घडवली चांगलीच अद्दल

‘आता हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेने जाणार’; किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने खळबळ

‘…तर Omicron मुळे देशात तिसरी लाट येईल’, IMAचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More