शरद पवारांचा आत्मकथेतून अत्यंत खळबळजनक खुलासा!
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. यात शरद पवारांनी अत्यंत खळबळजनक खुलासा केलाय.
पुस्तकाच्या माध्यमातून 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाबाबत शरद पवार पहिल्यांदाच बोलले.
अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, असं शरद पवार यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे.
महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं, असं म्हणत शरद पवार यांनी पहाटेचा शपथविधी आपल्या परवानगीशिवाय झाला असल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.