बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली- चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यासंदर्भात फडणवीस यांनी स्वत: ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस-पवार भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी सुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी आता जळगावात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याशी त्यांनी चर्चा केल्यांचं वृत्त समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर, मात्र रेशन दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

विवाहीत प्रियकराकडे प्रेयसीने केली लग्नाची मागणी, प्रियकराने केलं असं काही की…

दिलासादायक बातमी! देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये 25 हजारांनी घट, तर कोरोनाबळीही 2800च्या खाली

7 महिन्याच्या बाळाला आईनेच केली जबर मारहाण; कारण अत्यंत धक्कादायक

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची बैठक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More