‘…नाहीतर मलाही बेळगावला जावं लागेल’; शरद पवारांचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कर्नाटक सीमावाद पुन्हा उफळून आला आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करण्यात आले. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

हे प्रकरण 48 तासांत नाही मिटलं तर मला बेळगावात जावं लागेल. सगळं नाही थांबलं तर आमचा संयम सुटेल, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

सीमा वादावर वेगळी भूमीका घेतल्यानंतर जे काय होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला

बोम्मईची ही भूमिका देशाच्या ऐक्यासाठी घातक असल्याचं शरद पवार म्हणालेत. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिलाय.

दरम्यान, बोम्मईच्या वक्तव्यांमुळे सीमाभागातली परिस्थीती गंभीर झाली आहे. बेळगावमध्ये जे घडलं ते निषेधार्ह आहे. महापरिनर्वाणदिनी घडलेला हा प्रकार निषेधार्ह आहे, असं शरद पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-