मुंबई | कमलनाथ चमत्कार करू शकतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तृत्वाबद्दल मला विश्वास आहे, त्यांची क्षमता मी जाणतो. ते चमत्कार करू शकतात असं लोकांनाही वाटतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.
शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला दोष देता येणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सरकार गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला कोसळणार, असा दावा भाजपचे नेते करत असले तरी राजकीय भूकंपाचा दावा करणाऱ्यांचा शिमगा आता संपलेला आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी महाविकास आघाडीला धोका असल्याची शक्यता फेटाळून लावली.
दरम्यान, काँग्रेसकडे नेतृत्व आणि कर्तृत्वही आहे आणि त्या पक्षाचे भविष्य ऊज्ज्वल आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
राज ठाकरेंच्या ‘शॅडो कॅबीनेट’वर शरद पवारांचा पुणेरी टोमणा!
ज्योतिरादित्य म्हणजे माझ्या घरी कोणत्याही क्षणी येऊ शकते अशी व्यक्ती होती- राहुल गांधी
महत्वाच्या बातम्या-
राज्यात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण, पण घाबरुन जाण्याचं कारण नाही- उद्धव ठाकरे
सरकारने मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्यावेत- चंद्रकांत पाटील
मास्क लावण्याची गरज नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments are closed.