महाराष्ट्र मुंबई

अहो फडणवीस, राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या; पवारांचं फडणवीसांना आव्हान

Loading...

मुंबई | जर हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुक त्यांनी लढवून दाखवावी, असं शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनातून महाविकास आघाडीला ललकारलं होतं. यावर राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या, असं आव्हान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीसांना केलं आहे.

फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. यावर सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असं फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान, आता पवारांनी दिलेल्या या आव्हानावर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

इंदुरीकरांनी 25 वर्षात अनेक चुकीच्या चालीरीती बंद केल्या- बाळासाहेब थोरात

“इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या”

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही- सदानंद मोरे

भाजप कार्यकर्ते आहत का? सगळे बीळात शिरले- नवाब मलिक

तृप्ती देसाई, नगरमध्ये येऊन दाखवाच; शिवसेनेच्या आष्टेकरांचं आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या