महाराष्ट्र मुंबई

पडद्यावरील नथुराम भडकला; कमल हसनच्या वक्तव्यावर म्हणतो…

मुंबई | अभिनेते आणि मक्कम निधी मयम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी हिंदू दहशतवादावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत असताना नथुराम गोडसेची भूमिका रंगभूमीवर निभावणारे अभिनेते शरद पोक्षें यांनी कमल हसनवर टीका केली आहे.

हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी आहे. इतिहास साक्ष आहे की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणं केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कुठे रहात असतील तर ते हिंदूस्थानात. आणि हे कित्येक मुसलमानांच मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा उल्लेख करतोय तेही जाहिरपणे. आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

सरसकट हिंदूंनाच दहशतवादी ठरवलं जातय. हे वक्तव्य करणाऱ्या कमल हसनचा मी तीव्र निषेध करतो. आपल्याला पटलं तर तूम्ही ही करा. हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे, असं ते म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

-शरद पवार फिल्डवरचे नेते; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

-ममता बॅनर्जींचा विनोदी फोटो केला व्हायरल; भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला पडलं महागात

-वाढीव दिसतंय राव; ‘टिकटॉक’वरील व्हीडिओमुळे तरुणाला अटक

-मुंबईचा विजय धोनीच्या चाहत्यांना सहन होईना; अशाप्रकारे काढतायत राग

-कमल हसन सर ‘देश तोडणं बंद करा’; अभिनेता विवेक ऑबेरॉयची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या