बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजसाहेबांचं आजचं भाषण बाळासाहेबांची आठवण करून देणारं”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं उत्तर सभेतील भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता कलाविश्वातून राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक झालं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर देखील बरेच सक्रिय असतात. शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत राज ठाकरेंच्या कालच्या सभेतील भाषणावर वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंच्या उत्तर सभेतील भाषणाचं शरद पोंक्षेंनी कौतुक केलं आहे.

आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं आहे. बऱ्याचं काळानं धारदार भाषण. हिंदूची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यावाद साजसाहेब, अशा शब्दात शरद पोंक्षे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. शरद पोंक्षेंच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

दम्यान, शरद पोक्षे यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे. या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी शरद पोक्षेंच्या या पोस्टवर आपली सहमती देखील दर्शवली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘काळजी घे, दगदग करू नको’; पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे एंटरटेनमेंट, सिनेमात असतं तसं”

‘धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका नाही तर…’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

…अन् महिला चक्क topless होऊन मैदानात पळत सुटली, पाहा व्हिडीओ

“राज ठाकरेंना एवढं महत्त्व देऊ नका, माझ्याकडे तेवढा वेळ नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More