बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आनंद दवे हा डॅंबिस माणूस, त्यांनी…”, शरद पोंक्षेंची फेसबूक पोस्ट चर्चेत

पुणे | नथुराम गोडसे (Nathuram Godase) या नावाभोवतीच मोठा वाद घोंगावत असतो. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या (Father Of Nation Mahatma Gandhi) हत्येपासून अनेक स्तरातून अनेकदा गोडसेचं उदात्तीकरण करण्यात आलं. मी व नथुराम (Me And Nathuram) हे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांचं पुस्तक (Book) आहे. या पुस्तकावरून अनेकदा वाद निर्माण झाला आहे. अशातच आता शरद पोंक्षे यांची एक फेसबुक पोस्ट (Facbook Post) प्रचंड वेगानं सध्या व्हायरल होतं आहे.

शरद पोंक्षे लिखीत मी व नथुराम या पुस्तकाची मागणी बाजारात प्रचंड आहे. या मागणीच्या जोरावरच तर पोंक्षे यांच्या पुस्तकाच्या 7 आवृत्त्या विकल्या गेल्या आहेत. परिणामी ब्राम्हण महासंघाच्या विनंतीनं शरद पोंक्षे यांनी आपल्या 8 व्या आवृत्तीचं प्रकाशन पुणे येथे ठेवलं होतं. यासाठी पोंक्षे यांना ब्राम्हण महासंघातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पोंक्षे यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. पण कार्यक्रम होऊन एक महिना उरकला तरी त्या हाॅटेलचं बिल दवे यांनी दिलं नसल्यानं पोंक्षे चांगलंच नाराज झाले आहेत. पोंक्षे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. हा माणूस मला नेहमीच डॅंबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केलंय, असंही ते म्हणाले आहेत. परिणामी आता मी व नथुरामचे लेखक शरद पोंक्षे यांनी नव्या वादाला सुरूवात केली आहे.

दरम्यान, शरद पोंक्षे आणि आनंद दवे यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. आनंद दवे यांच्याबरोबर कोणताच व्यवहार करू नये असं आवाहन शरद पोंक्षे यांनी केलं आहे. अशारितीनं मी व नथुराम हे पुस्तक पुन्हा वादात अडकलं आहे.

पाहा पोस्ट-

थोडक्यात बातम्या 

Omicron वाढतोय, शाळा सुरू होणार का?; वर्षा गायकवाड म्हणतात…

शिवेंद्रराजेंना धक्का! शरद पवारांच्या एका मताने शिवेंद्रराजेंचा पत्ता कट

‘कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर..’; रावसाहेब दानवेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज

अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नातील ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात, पाहा व्हिडीओ

“मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More