पुणे महाराष्ट्र

आमदार शरद सोनावणेंची कोलांटउडी; म्हणतात, “राज ठाकरे हेच खरे गुरु!”

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच माझे खरे गुरू आहेत, असं जुन्नरचे मनसे आमदार शरद सोनावणे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यातील मनसे मेळाव्यात बोलत होते. 

विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असताना सर्वांनी मला उमेदवारीसाठी नकार दिला. मात्र माझ्यावर विश्‍वास ठेऊन आमदारकीचे तिकीट देणारे राज ठाकरे हे माझे खरे गुरू आहेत, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याची क्षमता केवळ राज ठाकरेंकडेच आहे, अशा शब्दात राज ठाकरेंचं कौतुकही त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार आपले गुरु असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-पंकजा मुंडे बालिश, ती काय चिक्कीची फाईल आहे का?- प्रकाश आंबेडकर

-लेक बापाच्या खांद्यावर जात नसतो; सुसाईड नोटमध्ये मराठ्यांना भावनिक आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या