बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांच्या ‘या’ व्हिडीओमुळे वारकरी संतप्त, पाहा व्हिडीओ

मुंबई | प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शरद तांदळे यांनी केलेल्या वक्तव्यावर वारकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

महाराज बनवण्याचे क्लासेस घेण्याची वेळ आलीय. यात फूल पैसा आहे, कारण 80 टक्के जनता आपल्यासारखी बावळट आहे. पैसे मिळवण्यासाठी कीर्तन आणि महाराज होणं हे दोन धंदे खूप चांगले आहेत, असं तांदळे यांनी म्हटलं.

खेड्यात पाच पंचवीस लोकं एकदा बाबा म्हणून पाया पडले की अख्ख गाव पाया पडतं. त्याला खूप हुशार असण्याची गरज नाही. खूपच काही झालं तर शेवटी म्हणायचं ‘हरे राम’ किंवा हरे कृष्णा की संपलं. त्यापुढे जाऊन बोला पुंढली का वरदे म्हणायचं, सगळे लोक म्हणतात याला लईच कळतंय. शेवटी हरीपाठातील एखादा डायलॉग पाठ करायचा. हा धंदा लई सोपा आहे, असं शरद तांदळे यांनी म्हटलं आहे. शरद तांदळेंच्या या वक्तव्यावर वारकऱ्यांनी आक्षेप घेतला असून सोशल मिडीयावर संतापाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्र वारकरी संप्रदाय, संतविचार यांच्यामुळे ओळखला जातो. कीर्तनकार, वारकरी संप्रदाय, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्याचा मी निषेध करतो. त्यांनी जे शब्द बोलले ते मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील यांनी केली आहे.

शरद तांदळे नेमकं काय म्हणाले?

 

थोडक्यात बातम्या- 

“सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

कौतुकास्पद! दोन अक्षराच्या पत्यावरुन पोलिसांनी अडीच वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

“मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More