‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

जयपूर | वसुंधरा राजे थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत, असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना आपण हे मस्करीत बोललो होतो, असं त्यांनी म्हटलं आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्यावरुन शरद यादव यांच्यावर टीका होत होती. त्यांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

माझे त्यांच्याशी जूने संबंध आहेत. त्यात काहीही अपमानकारक नव्हतं. त्यांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं शरद यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद यादव यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे

-…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!