बिहारमध्ये झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी, शरद यादवांचं बंड

नवी दिल्ली | नितीश कुमार यांच्या भाजपसोबत जाण्यावरुन जेडीयू नेते शरद यादव यांनी आपलं मौन अखेर सोडलंय. नितीश कुमार यांच्या निर्णयावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

बिहारच्या जनतेने भाजपसोबत जाण्यासाठी जनादेश दिला नव्हता, त्यामुळे बिहारमध्ये झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं शरद यादव यांनी म्हटलंय. 

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शरद यादवांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे आगामी काळात शरद यादवांच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या