नवी दिल्ली | परमबीर सिंह प्रकरणात महाविकासआघाडी सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केलं. विरोधकांच्या आरोपांनाही यावेळी बोलताना पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ATS च्या तपासाची दिशा अचूक असल्याचा मला आनंद आहे. एटीएसने दोघांना अटक केली. मुख्य केस आहे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं आणि हिरेन हत्या ही होती. मात्र त्यावरुन लक्ष भरकटवून विरोधकांनी परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरला. ते चुकीचं आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
काल एटीएसने दोघांना अटक केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे. यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली, त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली. आता तपास सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप तथ्यहीन आहेत, असं म्हटलं आहे. पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, हा प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
18 वर्षीय मुलीनं बाप झोपेत असतानाच त्याचा गळा आवळला; ‘हे’ ठरलं कारण!
पुण्याची मान शरमेनं खाली!; महिलांवरील ‘या’ अत्याचारात पुणे सर्वात पुढे!
मुलगी लग्नास तयार होत नव्हती म्हणून… बापाच्या कृतीनं महाराष्ट्र हादरला!
“त्या पत्रामागे खूप मोठं कारस्थान, परमबीर सिंहांना माफीचा साक्षीदार करणार”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.