‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
मुंबई | राज्यावर एकापाठोपाठ अनेक संकट आली. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिंमत दाखवली, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
एकीकडे पूरग्रस्त घरांची बांधणी करणं हे सरकारसमोर आव्हान आहे. दुसरीकडे मागील 100 वर्षांपासून मुंबईमध्ये कष्ट करून महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी ज्यांनी घाम गाळला त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल पडतंय, असं शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून हा प्रश्न सुटला आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होतोय याचा मला आनंद होतोय, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, आज भूमिपूजन केलं, 36 महिन्याने आपण सगळे एकत्र चाव्या देऊ. आयुष्य काही-काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्रिपद स्वप्नात नव्हतं. आता त्याच्या खोलात जात नाही, ते स्वीकारलं. लहानपणापासून या परिसरात येणं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत यायचो. भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस
“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”
“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल”
जीवाचं रान करून 16 कोटी जमवले, इंजेक्शनही दिलं पण….; चिमुकल्या वेदिकाची झुंज अपयशी
‘कोरोनाची तिसरी लाट अटळ पण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती
Comments are closed.